केळापूर तालुक्यातील रोजगार सेवकांचे पांढरकवडा येथे तहसील समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
केळापूर तालुक्यातील रोजगार सेवकांचे पांढरकवडा येथे तहसील समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
पुज्य नगरी न्यूज
प्रतिनिधी अमन सिडाम
महाराष्ट्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीमध्ये २८हजार१४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय निधीमधून ६ टक्के मानधनावर मागील १५ वर्षा पासून ग्रामपंचायती मध्ये ग्रामरोजगाराच्या पदावर काम करत आहे.५ वर्षामध्ये सत्ता परिवर्तन होत असून मात्र त्यांना स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मन मानी बडी पडावे लागत आहे .मन मानी बडी न पडता कामे केल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्याचा घाट घातला जात आहे .या प्रकारे यांच्यावर अन्याय होत आहे. म्हणून आम्हाला ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत कार्यरत असलेल्या रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करण्यात यावे. या प्रमुख मागणीचे निवेदन दिना. २३ सप्टेंबर ला मुख्यमंत्री यांना सोपवले गेले मागण्या पूर्ण नाही झाल्यास आम्ही महात्मा गांधी जयंती रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.परंतु मुख्यमंत्री द्वारे कोणतीही दखल घेतली गेली नाही म्हणून ३ ऑक्टोबर ला पांढरकवडा तहसील सामोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले होते .उपोषणाच्या स्थळावर जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन बेजांकिवर यांनी भेट दिली होती
Comments
Post a Comment