डिझेल , पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ परंडा येथे युवा सेनेच्या वतीने अंदोलन


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज  ( दि .३१ )

डिझेल , पेट्रोल , स्वयपाक गॅसचे दर  दिवसे दिवस वाढत असल्याने शिवसेनेचे यूवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने परंडा तालूका यूवा सेनेच्या वतीने दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी शिवाजी चौकात केंद्र सरकारचा निषेध करून अंदोलन करन्यात आले .

डिझेल पेट्रोल दर वाढी मुळे सर्व सामान्य नागरीकांना प्रचंड महागाईला तोंड दयावे लागत असुन हेच का आच्छे दिन असे म्हणत केंद्रातील भाजापा सरकारने नागरीकांची फसवणुक केल्याने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध करन्यात आला .

   इंधन दर वाढीमुळे वाहण परवडत नसल्याने नागरीकांना पुन्हा  बैलगाडी वापर करन्याची वेळ आल्याचे सांगून अंदोलनात बैलगाडी सायकल स्वार  सहभागी होऊन केंद्र सरकारचा निषेध करन्यात आला .
या वेळी जिल्हा प्रमुख गौतम लटके , जिल्हा समन्वयक मेघराज पाटील ,यूवा सेना तालूका प्रमुख राहुल डोके ,यूवा शाहर प्रमुख वैभव पवार , धनंजय खैरे , परशुराम गवारे , बाळासाहेब गायकवाड , समीर पठाण , जावेद पठाण , सतिश मेहेर , बप्पा कोळेकर , नशीर शहाबर्फीवाले , राजाभाऊ कारंडे , उमेश परदेशी , कुणाल जाधव , समाधान पिंगळे , शिवाजी खैरे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न