लाईट कट केली तर वीज वितरण कार्यालयात साप सोडणार.वैभव जावळे यांचा इशारा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज ( दि २९ ऑक्टोबर )
मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
दिवाळीच्या तोंडावर वीज वितरण कंपनीने सहा तारखेपासून लाईट तोडण्याचे आदेश आहेत असे सांगत आहेत एकीकडे दोन वर्षापासून कोरोणासारख्या संकटाने जनता हैराण झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून फक्त वसुली सुरू आहे. या सरकारला जनतेशी सरकारला काही देणे-घेणे नाही. दिवाळी सण हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो कोरोना ने हैराण झालेल्या जनतेला दिपवाळी कशी साजरी करावयाची ही पंचायत झाली आहे. तरी वीज वितरण कंपनीने दिपवाळीच्या या सणात तरी लाईट कट करू नये अन्यथा प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, प्रहार मोहोळ तालुका पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ऑफिसमध्ये साप सोडून आंदोलन करण्यात येईल असे मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे यांनी पत्रकारांशी बोलताना ईशारा दिला आहे .
[ ] दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची लाईट कट केली तर प्रहार शी गाठ आहे सर्व अधिकाऱ्यांना प्रहार स्टाईलने ठोकून काढणार
दत्ताभाऊ मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर
[ ] :मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला शेतकऱ्या विषयी आदर आहे पण आम्हाला वरून आदेश आल्यावर लाईट कट करावे लागते
आत्तर कामती वीज वितरण कंपणी
Comments
Post a Comment