कवठा शेत शिवारात बैलावर वाघाचा हल्ला वाघाचा बंदोबस्त करन्याची मागणी
कवठा शेत शिवारात बैलावर वाघाचा हल्ला
प्रतिनिधी अमन सिडाम
(यवतमाळ) केळापूर तालुक्यातील पाटण बोरी इथून ४किलो.मी. अंतरावर कौठा एथिल शेतकरी 'प्रमोद सातघरे‘ यांच्या शेतात चरत असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केल्याने बैल गंभीर जखमी झाला आहे .
सुदैवाने प्रमोद सातघरे हा थोडक्यात बचावला वाघाची दहशत कायम असल्याची किसान सभेतर्फे नायब तहसीलदार यांना निवेदन देन्यात आले होते
मात्र या वाघाचे अजूनही बंदोबस्त करण्यात आले नाही या परिसरात वाघाची दहशत कायम असून वन विभाग गप्प का बसले असे प्रश्न कवठा व परिसरातील गावा मध्ये होत असून .शेतकऱ्यांनी शेतातील कापूस सोयाबीन कसे काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे .या दहशतीमुळे शेतात मजूर मिळत नसल्याने शेती व्यवसाय डबघाईला आल्याचे चित्र दिसत असून वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे
Comments
Post a Comment