उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांच्या अस्सल उत्पादनांचे दालन उस्मानाबादकरांसाठी खुले,


 उस्मानाबाद करांनी लाभ घ्यावा : जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचे अवाहन 

 पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज ( दि २८ )
उस्मानाबाद -जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद व उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आद्या हिरकणी जिल्हास्तरीय विक्री केंद्राचे उदघाटन दि २७ रोजी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.रत्नमाला टेकाळे, पंचायत समिती सभापती हेमलता चांदणे, उप-सभापती प्रदीप शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, सहजिल्हा अभियान संचालक तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सौ.प्रांजल शिंदे, गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समिती कार्यालयानजीक असणाऱ्या गाळ्यामध्ये उमेद अभियानांतर्गत जिल्हयातील महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या अस्सल व गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनाला यावेळी सुरुवात करण्यात आली. जिल्हयात महिलांचे १४ हजार ५६३ स्वयंसहाय्यता समुह स्थापन करण्यात आले असुन गावस्तरावरावर विविध उपजीविकेचे उपक्रम सुरु आहेत. त्यामध्ये गटातील महिला खाद्यपदार्थ व इतर उपयोगी वस्तुंचे उत्पादन करतात. सदर गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणुन सदर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली असल्याचे तसेच महिला स्वयंसहाय्यता समुहांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने महिलांनी मोठया प्रमाणावर गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती करावी व बाजारात असलेल्या अन्य उत्पादनांच्या सोबत स्पर्धा करत, उत्पादन व उत्पादन पद्धतीत बदल करत आपले व आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवावे, व उमेद अभियानाचा नावलौकिक वाढवावा असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सांगितले. पंचायत समिती सभापती, रत्नमाला टेकाळे, हेमलता चांदणे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व उपसभापती प्रदीप शिंदे यांनी आपल्या गटांनी तयार केलेली उत्पादने जास्तीत जास्त विकत घेण्याबाबत संपर्कातील सर्वांना आग्रह करणार असल्याचे यावेळी सांगितले. नियमित साजरे होणारे समारंभ, कार्यक्रम इ.मध्ये  मोठया प्रमाणावर देण्यात येणारे बुके वापरानंतर वाया जातात व पैशांचादेखील अपव्यय होतो याला पर्याय म्हणुन महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उपयोगी वस्तुंची आकर्षक बास्केट तयार केली असुन जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपल्या आप्तस्वकीयांना भेटवस्तु म्हणुन देताना किंवा स्वागतासाठी हीच बास्केट द्यावी व स्वतःच्या कमाईचा पैसा वाया जाऊ देऊ नये याने भेटवस्तु देणाऱ्याला व घेणाऱ्याला दोघांनाही समाधान मिळेल असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांनी आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी, व पदाधिकारी सदस्यांनी  गटांच्या उत्पादनांची खरेदी केली व  गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. सदर विक्री केंद्रामध्ये महिला गटांनी उत्पादित केलेल्या रुचकर चटण्या, पापड, लोणचे, मसाला, खवा, पेढा, कलाकुसरीच्या व शोभेच्या वस्तु,अत्तर,तेल,उटणे, अभ्यंगस्नानाची-पुजेची कीट, आवळा कँडी, शेवया,  दिवाळीच्या फराळाचे चविष्ट पदार्थ, तसेच असंख्य खाद्यपदार्थ व इतर वस्तु उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुंडे, जिल्हा प्रोग्रामर मेघराज पवार, जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे,समाधान जोगदंड, अमोल सिरसट, गोरक्षनाथ भांगे, सर्व तालुक्यांचे तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक , प्रभागसमन्वयक, उद्योगसखी, एमसीआरपी,  स्वयंसहाय्यता समुहातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बलवीर मुंडे यांनी मानले तर आभार तालुका अभियान व्यवस्थापक पुजा घोगरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न