भिमा सहकारी साखर कारखान्याचे मोठ्या उत्साहात जेष्ठ सभासद यांच्या हस्ते मोळी पूजन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे दि.३०
सिकंदर टाकळी येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाणी मध्ये दि ३० रोजी उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी चेअरमन महाडीक यांनी विरोधाकावर सडकुन टीका केली ही बाब विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारी आहे. मात्र आजतागायत जो त्रास झाला आहे, सभासद व कामगारांची जी देणे थकली होती, कारखाना सुरू होऊ शकला नाही या घटनेला फक्त कोल्हापूरचा मनोरूग्ण पालकमंत्री या ठिकाणचे चिल्लर विरोधक जबाबदार असल्याचा घणाघात करून सभासद व कर्मचाऱ्यांना जो त्रास सहन करावा लागला. याची परतफेड येणाऱ्या निवडणुकीत ते नक्कीच करतील असा विश्वास 'भीमा'चे चेअरमन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की केवळ साखरेच्या उत्पादनावर येणाऱ्या काळात बिले देणे अवघड होईल म्हणून इथेनॉल प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याचा आमचा मानस असून तो प्रोजेक्ट 365 दिवस चालेल अशी टेक्नॉलॉजी व अत्याधुनिक यंत्रणा करण्यासाठी संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. गेल्या आठवड्यात सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी मंत्री रावसाहेब दानवे व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील सहकार यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये ज्या कारखानदारांना इन्कम टॅक्स च्या नोटीस आल्या होत्या. त्या रद्द करण्याचा प्रामुख्याने विचार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 8 हजार 300 कोटी रुपयांचा दिलासा कारखानदारांना मिळेल असे सांगितले. येत्या महिनाभरात कामगारांच्या चार पगारी देणार असल्याचे सांगून दिलेल्या शब्दानुसार एक पगारी चा बोनस देखील दिला आहे. त्यामुळे कामगारांनी आपली संस्था आपले मंदिर वाचावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
[]
टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा 42 वा गळीत हंगाम शुभारंभ भिमाचे ज्येष्ठ सभासद सज्जन पवार, सुखदेव चव्हाण, विलास दाईंगडे, चंद्रकांत भोसले, नवनाथ वसेकर, रामचंद्र जाधव, राजकुमार व्यवहारे या सभासदांच्या शुभहस्ते मोळी पूजन करून व गव्हाणी मध्ये ऊस टाकून करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, जि.प. सदस्य शैला गोडसे, पवन महाडिक, विश्वराज महाडिक, विजय महाडिक, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, शिवाजी गुंड, भीमराव वसेकर, सुरेश शिवपुजे, उत्तम मुळे, संतोष चव्हाण, जमीर मुजावर, संतोष सुळे, डॉ.कीलमिसे, युवराज चौगुले, किसन जाधव, राजू बाबर, भारत पाटील, बाबासाहेब जाधव, प्रशांत पाटील, प्रमोद जाधव, अमोल व्यवहारे, राहुल व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संचालक गणपती पुदे, बापू चव्हाण, दादा शिंदे, बापू जाधव, तुषार चव्हाण, दिलीप रणदिवे, अनिल गवळी, राजेंद्र टेकळे, सिद्राम मदने, अंकुश गवळी, सिंधू जाधव, बिभीषण वाघ, आबादेव पुजारी, दिगंबर बाबर, तात्या नागटिळक, हरिभाऊ चवरे, सुधीर भोसले, राजकुमार पाटील, जयंत पाटील, भाऊसाहेब जगताप माणिक पाटील, इंगळे यांच्यासह सभासद, शेतकरी, कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment