मोहोळ नगरपरिषद व पंचायत समिती यांच्याकडून 5 दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड.मनोज धोत्रे


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ३
मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

आज मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी  योगेश डोके  यांनी मोहोळ शहरातील 5 दिव्यांग बांधवांना दिवाळीची खास भेट दिली आहे  योगेश डोके  यांना काल प्रहार अंपग संघटना तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे भेटले असता त्यांनी त्यांच्या दिव्यांग बांधवांची व्यथा त्यांना सांगितली व साहेब तुम्ही आमच्या किमान पाच तरी लोकांची दिवाळी साजरी करा असे विनंती केली.
 व त्यांनी ती विनंती ला मान देऊन लगेच पूर्तता करून दाखवली व गट विकास अधिकारी गणेश मोरे  यांनी देखील 5 दिव्यांग बांधवांना दिवाळीचे किट वाटप केले. व त्यांनी  नंदकिशोर बागवाले  यांना सांगितले व आमच्या दिव्यांग बांधवांना आनंदाचे वातावरण पसरले आहे . 
अपंग क्रांती मोहोळ तालुका अध्यक्ष मनोज धोत्रे म्हणाले की तुमच्यासारखे अधिकारी दहा वर्षांपूर्वी आले असते. तर आमच्या दिव्यांग बांधवांचे आज पर्यंत सक्षमीकरण चांगल्या प्रकारे झाले असते. असे नमूद केले यावेळी धनाजी चोरमुले, सुनील माने ,मनोज खिलारे ,तानाजी आबा खंदारे, अण्णा चव्हाण ,रोहिदास पवार, दिगंबर होनमाने ,गोपीनाथ पवार ,मनोज पुराणिक ,नजीर शेख, शहेनशहा शेख अनेक प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न