शेततळ्याचे रखडलेले १२.५कोटी रुपये कृषीमंत्री बरोबर मिंटिग घेऊन तत्काळ मार्गी लावु...राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १ नोव्हेंबर
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू कामानिमित्त पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांची पुणे येथे भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांची संदर्भात चर्चा करण्यात आली.व तसेच MTS मधून शेतकऱ्यांच्या शेततळ्याचे रखडलेले 12.5 कोटी रुपयांची मागणी केली. भाऊंनी ही कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांना फोन लावून त्या संदर्भात चर्चा करून लवकरच मीटिंग लावतो असे सांगितले.
लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या रखडलेली अनुदान देऊ आश्वासन दिले तसेच माढा तालुक्यात लवकरच शेतकरी मेळावा , अपंगाना साहित्य वाटप आणि संपर्क कार्यालय उद्घाटन करण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले. जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे तालुका कार्याध्यक्ष संतोष कवले, उंदर गावचे माजी उपसरपंच बालाजी नाईकवाडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment