साखर आयुक्तांनी ऊस बिलातून वीजबिल वसूली करण्याचा आदेश तात्काळ रद्द करावा अन्यथा प्रहार रस्त्यावर उतरणार : विशाल सपकाळ

साखर आयुक्तांनी ऊस बिलातून वीजबिल वसूली करण्याचा आदेश तात्काळ रद्द करावा 

अन्यथा प्रहार रस्त्यावर उतरणार : विशाल सपकाळ

*कूरुल (प्रतिनिधी) नानासाहेब ननवरे
  महाराष्ट्रातील शेतक-यांचे थकीत वीजबिल ऊस एफआरफीमधून वीजबिल वसूल करावी.असा आदेश साखर आयुक्तांनी साखर कारखानदांराना दिला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे.
         साखर आयुक्तांनी कोणत्या कायद्यानुसार वसुलीचे आदेश दिला आहे.आदी साखर आयुक्तां नी स्पष्ट करावे.हा आदेश केवळ महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे काढला आहे ते पण साखर आयुक्तांनी स्पष्ट करावे.जर हा आदेश मागे नाही घेतला तर महाराष्ट्रातील सर्व ऊस शेतकरी रस्तावर उतरणार व साखर आयुक्त आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संघर्ष अटळ आहे.ऊस उत्पादक शेतक-यांचे उत्पादन अधिकचे असूनही वीजबिल अदा केले जात नाही.
      महावितरणची  थकबाकी शेतक-यांकडे थकीत आहेत.त्यामुळे शेतक-यांचे थकीत वीजबिल ऊस आणि एफआरफीमधून वसूल करावी असा आदेश साखर आयुक्तांनी साखर कारखानदारांना दिला आहे.मात्र साखर आयुक्तांनी महावितरणचे थकीत वीजबिल वसूल कोणत्या अधिकारात दिला आहे.असा प्रश्न प्रहारचे युवा नेते विशाल सपकाळ यांनी केला आहे.तरी हा आदेश रद्द करावा ; अन्य था सोलापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता मस्के आणि सोलापूर शहरप्रमुख अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकरी यांना सोबत घेवून रस्तावर उतरून जन आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ दिला आहे..
   
[I विशाल सपकाळ (प्रहार युवक नेते)     
१९६६च्या ऊस दर नियंत्रण कायद्याचा हवाला देत १९६६च्या ऊस दर नियंत्रण कायद्याच्या तरतुदीत शेतक-यांच्या एफ आर फी मधून कोणतेही पैसे वजा केले जाऊ नयेत.असा कायदा असताना साखर आयुक्तांनी हा आदेश का दिला हे स्पष्ट करावा आणि काढलेला आदेश तात्काळ मागे घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न