मोहोळ तालूक्यातील विरवडे ( बु ) येते अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात.
विरवडे बु येते अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात...
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १०
कुरुल प्रतिनधी नानासाहेब ननवरे
मोहोळ तालुक्यातील विरवडे बु येते दिवाळीच्या पाडाव्या दिवशी विना पूजननाने अखंड हरीनाम सप्ताहाची सुरवात करण्यात आली आहे. हा सप्ताह श्री सद्गुरू कै ह.भ.प तात्यासाहेब {आंबा} वासकर महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री गुरुवर्य ह भ प विठ्ठल {दादा} वासकर महाराज यांच्या प्रेरणेने वर्षोनुवर्षे परंपरेने चालत आलेल्या आहे.
[]
अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात दि. 5/11/2021 ला सुरवात झाली आहे. तर 13/11/2021 ला समाप्ती होणार आहे. दर दर वर्षीप्रमाणे दिवाळीच्या पाडव्याला या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरवात केली जाते. यामध्ये सकाळी 7.30 ते 9.30 पारायण ,10 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 2 ते 4 गाथा भजन सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ ,6 ते 7 प्रवचन व जप रात्री 9 ते 11 कीर्तन ,11 ते2 हरिजागर व पहाटे 4 ते 6 काकडा आरती असे ८ दिवस कार्यक्रम चालतात. तर शेवटच्या दिवशी 12 ते 5 पर्यंत सोंगी भारुडाचा कार्यक्रम चालतो. तर 13/11/2021 ला संपूर्ण गावातून पालखी व दिंडी प्रदक्षणा आहे ,
गावात कोणतेही यात्रा किंवा ऊत्सवच नसल्यामुळे सर्व गावकरी हा दिवाळीत साजरा होणार अखंड हरिनाम सप्ताह हाच मोठया उत्साहाने साजरा करतात. सप्ताहामध्ये कालावधीत हनुमान मंदिर परिसरात व मंदिरावर विविध प्रकारची विधुत रोषणाई करण्यात आली आहे. या सप्तहात 8 दिवस सकाळी नास्ता दुपारी व संध्याकाळी वारकर्यासाठी गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचा आयोजन केलं जाते. तर शेवटच्या दिवशी गावातून हनुमान पालखी व दिंडी प्रदक्षणा घातली घालून महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमची सांगता केली जाते. हा सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विरवडे ग्रामस्थ, हनुमान भजनी मंडळ व पंच कमिटी परिश्रम घेत आहे.
Comments
Post a Comment