उद्योजक राजाभाऊ शेळके यांच्या वतीने सोनगीरी व कात्राबाद येथे दिवाळी कीट वाटप
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज परंडा
कात्राबाद चे भूमिपुत्र असलेले उद्योजक राजाभाऊ शेळके यांच्या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून कात्राबाद व सोनगिरी येथे दिवाळीनिमित्त मोफत साखर वाटप करण्यात आली.
दिवाळीनिमित्त , सुवासिक तेल, अंघोळीसाठी उटणे, सुगंधी साबण तसेच दिवे लावण्यासाठी पणत्या असे मिळून एक किट तयार करण्यात आले होते. या किटचे वाटप गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मार्फत करण्यात आले.
राजा भाऊ शेळके यांच्यामार्फत कात्राबाद गावात गेल्या दोन वर्षा पासुन स्वखर्चाने पाणीपुरवठा करन्यात येत आहे .
तसेच त्यांनी मागील दोन वर्षांपूर्वी कात्राबाद येथील ग्रामस्थांना काशी तीर्थ यात्रा घडवली. गावातील मंदिराचे जिर्णोद्धाराचे कामही चालू करन्यात आले आहे.
राजाभाऊ शेळके यांच्या सामाजिक कामाचा धडाका पाहता ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी विष्णू गरड सर, गणेश कोकाटे, दरिबा शिंदे, विश्वनाथ देवकर, श्रीहरी शिंगारे, जालिंदर कोळी, गोकुळ गरड, शहाजी मुळे, दत्तात्रय कांबळे, बळीराम गरड, महादेव गरड, अंबादास शिंदे, रोहिदास गरड, विलास गरड, नवनाथ शेळके, ईश्वर बोराडे, नारायण बोराडे, आप्पा गरड, दीपक दादा गरड, अतुल कोकाटे, इम्रान पटेल, पांडुरंग गरड, भास्कर कोकाटे, युवराज गरड, अंगद भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment