अक्कलकोट हुन सोलापूरकडे येणारे जीपचा कुंभारी याठिकाणी भीषण अपघात ५ जण जागीच ठार.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १६
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
: सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अनेक महिन्यात नंतर भीषण अपघात झाला. सर्वच रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने अपघात क्वचितच होत आहेत .मात्र मंगळवारचा दिवस अक्कलकोट वरून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी घातक ठरला.
प्रवासी जीप मध्ये प्रवास करणारे तब्बल पाच जण जागीच ठार झाले तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत दोन महिला आणि तीन पुरुष जागीच ठार झाले आहेत अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान प्रवासी जीपचा पुढचा टायर फुटून जीप पलटी झाली आणि हा अपघात झाला अशी माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर आली मात्र हा अपघात टायर फुटल्याने झालाच नाही हा अपघात तर जीपचा चालक वारंवार फोनवर बोलत होता त्याचे लक्ष विचलित होते समोर खड्डा आला आणि अचानक जोरात ब्रेक त्यांनी दाबला त्यामुळे वेगात असलेली गाडी दोन वेळा पलटी झाली अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले काही प्रवासी आत मध्ये दाबून गेले त्यामुळे पाच जणांवर काळाने घाला घातला. याबाबत अक्कलकोट वरून पुण्याला जाणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाने सविस्तर हकीकत सांगितली पहा ते काय म्हणाले.....
Comments
Post a Comment