माळी सेवा संघ इंदापूर तालुका कार्यकारिणी लवकरच घोषित करणार -बापूसाहेब बोराटे


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि .१८
प्रतिनिधी  नानासाहेब ननवरे

  माळी सेवा संघाची इंदापूर तालुका कार्यकारिणी लवकरच घोषित होणार आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष श्री बापूसाहेब बोराटे यांनी दिली आहे . पुणे येथे प्रदेश पदाधिकारी यांना नवीन कार्यकारिणी विषयी माहिती देऊन तालुका कार्यकारिणी यांची निवडीसाठी शिफारस केलेली आहे त्या मीटिंगसाठी माळी सेवा संघ संस्थापक मा .अध्यक्ष श्री दत्ताभाऊ माळी, प्रदेश कायदेशीर सल्लागार ॲड श्री नितीन राजगुरू, प्रदेश महिला उपाध्यक्षा मा सौ उर्मिला ताई भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष उमेश गायकवाड, मंगल ताई रायकर, सविताताई रायकर  आदी वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.                यावेळी बापूसाहेब बोराटे यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून इंदापूर तालुक्यामधून काही नावांची शिफारस करण्यात आली आहे .लवकरच प्रदेश  कार्यकारिणी मधून नावे निश्चित झाले वरती नवीन तालुका कार्यकारिणी घोषित करणार आहोत. अशी माहिती तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांनी दिली आहे.
       या कार्यकारिणी मध्ये तालुक्यातील जास्तीत जास्त युवक व महिलांना समाजाची सेवा करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे व माळी सेवा संघात निष्ठावान कार्यकर्ते यानांच संधी मिळणार आहे असे तालुका अध्यक्ष यांनी सांगितले
        जे पदाधिकारी समाजातील गोर गरीबांना शासकीय योजना यांचा लाभ मिळण्यासाठी मदत करून ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या समाज बांधवांना इंदापूर तालुका माळी सेवा संघ व  इंदापूर शहर कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात येणार आहे अशी माहिती इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांनी दिली. 
*जर समाजकार्याची आवड असणाऱ्या समाज बांधवांना इंदापूर तालुका माळी सेवा संघ कार्यकारिणीमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर संपर्क कर साधण्याचे आव्हान  त्यांनी केले आहे 
8600201187

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न