कामती वीज वितरण कार्यालयासमोर प्रहारचे ठिय्या आंदोलन..
अत्तर साहेब यांनी लेखी एक तासाची लाईट सोडतो म्हटल्यानंतर आंदोलन मागे...
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २३
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
: शेतीपंपाची लाईट चालू करावी म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने कामती वीज वितरण कार्यालयाला 19 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आलं होतं .लाईट नाही चालू केल्यास 23 नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार त्यामुळे ते आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे, मोहोळ तालुका प्रमुख आबासाहेब गुरव, मोहोळ तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे, मोहोळ तालुका युवा अध्यक्ष नानासाहेब खांडेकर, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ ,औद्योगिक तालुकाप्रमुख नितीन भोरे मोहोळ तालुका प्रसिद्धीप्रमुख विशाल मासाळ, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष समर्थ गुंड, शिंगोली शाखाध्यक्ष अभिषेक पाटील ,उपाध्यक्ष दिनकर पाटील, सिताराम मासाळ, आबा मासाळ, केशव सुतार व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
चौकट
कामती वीज वितरण सब स्टेशन प्रमुख आत्तार साहेब यांनी निवेदन स्वीकारले व शेतकऱ्यांना एक तासाची सुरळीतपणे लाईट देऊ असे लेखी दिले. त्यावेळी वैभव जावळे म्हणाले की एक तासाची लाईट सुरळीत नाही चालली तर एम.एस,सि,बी, ऑफिस मध्ये शेतकऱ्यांचे जनावरे तुमच्या ऑफिसमध्ये आणून सोडतो..
शेतकरी अडचणीत असल्यामुळे तुम्ही वीज वितरण अधिकारी व आघाडी सरकार जाणूनबुजून शेतकऱ्याला त्रास देत आहे.
शेतकरी तर पैसेच नाही तर कुठलेही शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे जाणून-बुजून त्रास देऊ नये असे आबासाहेब म्हणाले, शेतकऱ्यांना दोन ते तीन महिन्याची मुदत द्यावी लाईट बिल भरण्यासाठी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे..
Comments
Post a Comment