फुलचिंचोलीच्या दोन मुलींची शिष्यवृत्तीसाठी निवड..
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २४
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, फुलचिंचोली या प्रशालेतील इयत्ता आठवी मधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना (N.M.M.S) 2020-21 या वर्षासाठी प्रशालेतील दोन विद्यार्थिनींची स्कॉलरशिपसाठी सारथी, पुणे या संस्थेतर्फे निवड झालेली आहे.
त्यांना नववी ते बारावी पर्यंत वार्षिक १२ हजार प्रमाणे संपूर्ण ४८ हजार रुपये अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थिनी खालील प्रमाणे -१) कु. अश्लेषा रामेश्वर डोंगरे,२) कु. श्रेया उत्तम जाधव या दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. एस.डी.राजे तसेच भीमाचे माजी व्हाईस चेअरमन कल्याणराव पाटील, सरपंच नारायण जाधव,संचालक बिभीषण वाघ, युवक नेते रमाकांत (नाना) पाटील , शहाजीराव पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार,दै.पंढरी भुषणचे पत्रकार सावता जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक अजित नकाते सर व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. व याबद्दल राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने व ग्रामस्थाकडुन विद्यार्थिनीचा सत्कार ही करण्यात आला.
Comments
Post a Comment