महात्मा फुले गौरव पुरस्कार २०२१ देऊन दत्तात्रय माळी यांना सन्मानित करण्यात येणार



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज : दि २० 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 

पुणे येथे कॉलेजचे प्राचार्य मेजर थाॅमसकॅडी यांनी ब्रिटिश  सरकारच्या वतीने  महात्मा फुले यांच्या कार्याची शैक्षाणिक दखल घेऊन महात्मा फुले यांच्या पुणे येथील विश्रामबाग तेथे सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत दिनांक 16 नोव्हेंबर 1852 रोजी त्या शालजोडी देऊन सत्कार करण्यात आला होता.
 या दिनाच्या 169 व्या स्मरणीय दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी अभिवादन कार्याच्या खंडाळा जिल्हा सातारा येथे महात्मा फुले विचार अभियान संयोजक व फुलेप्रेमीच्या वतीने अभिवादन व क्रांतिकार्य उजाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल आपणास *महात्मा फुले युवा गौरव पुरस्कार 20121 या सन्मानाने माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय भाऊ माळी यांना सन्मानित करण्यात येत आहे*. आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत फुले विचार पोचलं बदल हा पुरस्कार देण्यात येत आहे.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार व प्रचार प्रसार कृतिशील कार्याबद्दल महात्मा फुले युवा गौरव पुरस्कार सन्मानाने सन्मानित करण्यात येत आहे. 
या कार्यक्रमाचे ठिकाण तरी हा पुरस्कार वितरण सोहळा गुरूकुल विद्यामंदिर रजिस्टर ऑफिस मागील बाजूस एम. एस .सी. बी ऑफिस समोर खंडाळा तालुका जिल्हा सातारा दिनांक 21 /11 /2021 रोजी सकाळी 11:30 वाजता संपन्न होईल..

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न