हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त मोहोळ तालूक्यातील कुरूल येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे हजरत टिपू सुलतान जयंती उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हजरत टिपू सुलतान युवा मंचचे अध्यक्ष व पदाधिकारी गावातील लोकांना भव्य रक्तदान शिबिर साठी रक्तदात्यांनाचे महत्त्व पटवून रक्तदान करण्याचे आव्हान केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत 45 रक्तदात्यानी रक्तदान केले व या भव्य रक्तदान शिबिर घेण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष दाऊद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली होती. रक्तपेढीच्या वतीने डॉ.शाकीर हकीम, अक्षदा राठोड यांचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरामध्ये 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना अल्प आहार व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे कुरुल चे सरपंच माणिक पाटील उपसरपंच पांडुरंग बाबा जाधव ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव ,पत्रकार महेश कुलकर्णी, जलकमल उद्योग समूहाचे संस्थापक अमर लांडे ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी , ग्रामपंचायत सदस्य सिताराम दादा लांडे,आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दाऊद शेख, साहिल शेख, अफसर शेख शाईन शेख, शाकीर तांबोळी व हजरत टिपू सुलतान युवा मंचचे कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment