जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सत्कार
जिल्हाधिकारी यांचे कार्य अभिमानास्पद : जिल्हाप्रमुख दत्ता (भाऊ) मस्के पाटील
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २९
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा. मिलिंदजी शंभरकर साहेब यांना सर्व उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून राज्यपाल यांच्या कडून गौरव पुरस्कार देण्यात आला त्यानिमित्ताने प्रहार संघटनेच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना च्या काळात अतिशय प्रभावीपणे काम करत असून कोणताही इगो नसलेला अधिकारी आणि सर्वसामान्यांच्या हाकेला सुद्धा अगदी प्रत्येक क्षणी धावून जाणारा माणूस म्हणून आपली प्रतिमा त्यांनी निर्माण केली आणि ज्या प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील अनेक कामांच्या बाबतीत स्वतः लक्ष घालून त्यांनी सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम केलं.
कोरोनाची परिस्थिती एवढी बिकट असताना ऑक्सिजन, रक्त,बेड सर्वाचीच चणचण भासत असताना सुद्धा योग्य नियोजनातून आगदी थोडक्या सामग्रीत सुद्धा लढाई जिंकता येते हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यपालांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला त्यांनी गेल्या दोन वर्षापासून केलेल्या कामाचा योग्य प्रकारे सन्मान होऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
आणि त्याच अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्ष ज्या प्रकारे वंदनीय बच्चु भाऊ हे चांगल्या अधिकाऱ्याच्या च्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील प्रहार च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेबांचा सन्मान आणि सत्कार त्यांच्या दालनात जाऊन केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील,शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी,शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार,शहर संपर्क प्रमुख जमीर भाई शेख,दक्षिण चे तालुकाध्यक्ष मोसिन तांबोळी, उत्तर चे प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ, मोहोळ चे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष वैभव जावळे, दक्षिण तालुका उपाध्यक्ष समर्थ गुंड करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, युवा तालुकाध्यक्ष नानासाहेब खांडेकर,प्रहार सैनिक सागर गुंड उपस्थित होते.
Comments
Post a Comment