दिवाळीनिमित्त चिंचोली काटी येथे गोर-गरिब महिलांना २५० साड्यांचे वाटप प्रा.महेश भोसले यांचा अनोखा उपक्रम
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ८
मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
दिवाळी पाडवा निमित्ताने चिंचोलीकाटी येथे राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक तथा युवा उद्योजक प्रा.महेश भोसले आणि त्यांच्या पत्नी सौ.अनिता भोसले यांनी मतदार संघातील वार्ड क्रमांक 2 मधील आपल्या मतदार संघातील माता-भगिनी महिलांना राजमुद्रा भारत गॅस एजन्सी (राजमुद्रा ग्रुप) कडून दिवाळी निमित्ताने भेट देऊन एक आगळी वेगळी दिवाळी साजरी केली आहे.
राजमुद्रा परिवारातर्फे चिंचोली काटी ग्रामपंचायत सदस्या सौ.अनिता महेश भोसले (भावी सरपंच) यांच्या हस्ते गोरगरीब महिलांना 250 साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष .महेश हनमंत भोसले तसेच विक्रम भोसले,राजेंद्र भोसले ,शहाजी भोसले ,योगेश भोसले, विष्णू भोसले ,दत्ता भोसले , वैभव भोसले ,अभिजीत भोसले , चिंचोली काटी गावचे तंटामुक्त अध्यक्ष किसन धोत्रे , भाऊ कोंडकर , ओंकार परिट , मारुती (बॉस) धोत्रे , भीम मदने , किसन सुरवसे , चंदू मदने आदी मान्यवर व इतर गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये दिवाळीनिमित्त २५० साडी वाटपाचा हा कार्यक्रम पार पडला.
Comments
Post a Comment