माळी सेवा संघ इंदापूर तालुकाची कार्यकारिणी जाहीर .



      पुज्यनगरी ऑनलाईन न्यूज : 
(मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

  माळी सेवा संघ इंदापूर तालुका बहुचर्चित कार्यकरणी आज इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांनी जाहीर केली .
   संपूर्ण महाराष्ट्र मध्ये माळी सेवा संघ  म्हणून कार्यरत असणारी माळी समाजाची  अग्रगण्य  संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माळी हे असून त्यांनी इंदापूर तालुका कार्य करणी जाहीर करण्यासंदर्भात इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांना सांगितले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी बापूसाहेब बोराटे यांनी लवकरच इंदापूर तालुका माळी सेवा संघाची कार्यकारिणी जाहीर करणार म्हणून  सूचक वक्तव्य केले होते ,त्यानुसार इंदापूर तालुक्यातील माळी समाजातील समाजकार्याची आवड असणाऱ्या युवक वर्ग तसेच काही जेष्ठ समाज कार्य करण्याची  आवड असणाऱ्या व्यक्तींना माळी सेवा संघांमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली आहे तालुक्यामधून खूप नावांची शिफारस करण्यात आली होती परंतु काही ठराविक समाजसेवकांची  माळी सेवा संघात  त्यांच्या समाजकार्याची संपूर्ण माहिती घेऊन निवड करण्यात आली आहे.
         या पदाधिकारी यांच्या मुलाखती महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार ॲड. नितीन राजगुरू व पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या.
     यावेळी तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, तालुका महिला अध्यक्षा वर्षाताई भोंग, तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय माळी, संघटक दादा शिंदे, अशोक शिंदे, सचिव संदीप बारवकर, हरिदास राऊत, सचिन व्यवहारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
*इंदापूर तालुका माळी सेवा संघ नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे 
 सुनिल बनसोडे (कचरवाडी) उपाध्यक्ष इंदापूर तालुका,
बाळासाहेब झगडे (झगडेवाडी) उपाध्यक्ष इंदापूर तालुका
 लक्ष्मण शिंदे (शिंदेवाडी) उपाध्यक्ष इंदापूर तालुका
दिपक शिंदे (विठ्ठलवाडी) सचिव इंदापूर तालुका
 किरण वाघ (अंथुर्णे) उपाध्यक्ष इंदापूर तालुका युवक आघाडी
गणेश भुजबळ (शिरसटवाडी) संघटक इंदापूर तालुका
भरत मोहिते (काटी) उपाध्यक्ष इंदापूर तालुका वधु वर 
महादेव शिंदे(शिंदे वस्ती) अध्यक्ष इंदापूर शहर
,किरण बोराटे (कडबनवाडी) सचिव इंदापूर तालुका युवक आघाडी
अमोल बोराटे (न्हावीगाव) अध्यक्ष सोशल मीडिया इंदापूर तालुका ,राम माळी (पिंपरी बुद्रुक) संघटक इंदापूर तालुका युवक आघाडी निवड करण्यात आली आहे..आज महाराष्ट्रामध्ये माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे काम जोमाने सुरू आहे..निवड करण्यात आलेली सर्व पदाधिकारी बांधव म्हणाले की आज  लिगल सेलचे अध्यक्ष नितीन राजगुरू व बापूसाहेब बोराटे यांच्या व  संघटनेच्या कामावर प्रेरित होऊन आम्ही संघटनेमध्ये प्रवेश केला आहे. नक्कीच संघटनेचे काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवुन काम करु.,

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न