प्रहार प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने अमर उपोषण सुरू
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ९
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
मंगळवेढा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 बाधित शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळावा ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करूनही सह्या करून ही नऊ महिने झाले तरी मोबदला मिळत नाही भुमिअभिलेख ने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे तर काही शेतकऱ्यांकडून टक्केवारी स्वरूपात पैसे घेऊन गायरान जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला आहे त्याची चौकशी व्हावी ,जमिनीची मोजणी योग्य करून शेतकर्यांना मोबदला द्यावा ,डीबीएल कंपनीने दमदाटी करून काही शेतकऱ्यांची घरे, व्यावसायिकांच्या टपऱ्या ,जनावरांचे गोठे काढले, पाईपलाईन चे नुकसान केले , रस्ता निकृष्ट दर्जाचा केला आहे तर त्या कंपनीवर कारवाई व्हावी ज्या शेतकऱ्यांच्या सह्या झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना त्वरित मोबदला द्यावा अशा अनेक मागण्या सहित प्रहारचे सदस्य व शेतकरी उपोषणास बसले आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत प्रहार माघार घेत नाही अशी कठोर भूमिका प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी व तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी घेतली आहे
यावेळी प्रहार चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नविद पठाण, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, शहराध्यक्ष आनंद गुंगे, तालुका उपाध्यक्ष जयंतकुमार ठेंगील, वेताळ मुरडे, विवेक कुंभार, मारुती डोके, बाळासाहेब डोके, रामहरी बंडगर, नामदेव बंडगर, उत्तम सरडे, पांडुरंग लेंडवे, जगन्नाथ गायकवाड व इतर शेतकरी उपोषणाला बसले आहेत. न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भुमीका घेतली आहे .
Comments
Post a Comment