शिराळ ते ता.माढा येथील पानंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवुन रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करा अन्यथा अंदोलन प्रहार चा इशारा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज: दि २९
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
शिराळ ते ता.माढा येथील पानंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवुन रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात यावा अन्यथा अंदोलन करन्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देन्यात आला आहे
तहसीलदार माढा यांना मागणी चे निवेदन देण्यात आले. असुन शिराळ ते हद्दीतील जुने गावठाण ते आढेगाव ला जाणारा जुना पानंद रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल मार्केटमध्ये नेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्या अभावी शेतातील ऊस व केळी ही पिके शेतामध्येच राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तरी प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा रस्ता खुला करण्यात यावा. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास प्रहार संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. असे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रहार संघटना जिल्हा समन्वयक पंडितराव साळुंके जिल्हा उपप्रमुख रमेश पाटील तालुकाध्यक्ष अमोल केसरे, तसेच शिराळ उपसरपंच समाधान (अण्णा )लोकरे, सुधीर लोकरे, रमेश लोकरे, भाऊ लोकरे, महावीर लोकरे, उमेश चव्हाण व इतर शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment