माळी सेवा संघ सोशल मीडिया सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अंबादास वाघमारे यांची निवड.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १०
मोहोळ प्रतिनिधी नानासाहेब ननवरे:-
दि. 9 नोव्हेंबर रोजी माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना सोलापूर जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी अंबादास वाघमारे यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय भाऊ माळी ,उपाध्यक्ष बालाजी माळी , यांच्या हस्ते देण्यात आला या अगोदर अंबादास वाघमारे ही माळी सेवा संघ माढा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत होते आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना सोलापूर जिल्हा पदी निवड करण्यात आली आहे..
त्यावेळी माध्यमांशी बोलताना अंबादास वाघमारे म्हणाले की संघटनेने जी माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे ती नक्कीच पार पाडेल आणि संघटना वाढीसाठी शंभर टक्के प्रयत्न करीन.. अंबादास वाघमारे यांची निवडीमुळे तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये असेच वातावरण निर्माण झालेला आहे आनंद व्यक्त केलेले आहे कारण एका सामान्य व्यक्तीला जिल्ह्याची जबाबदारी दिल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यावेळी..
वधुवर सुचक अध्यक्ष मुरलीधर भुजबळ ,लिगल सेलचे अध्यक्ष नितीन राजगुरू, महाराष्ट्र प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब ननवरे, पश्चिम प्रदेश अध्यक्ष अमोल अनंतकळसकर, प्रदेश सचिव सचिन राऊत, महिला उपाध्यक्ष उर्मिला ताई भुजबळ, महिला संघटक रेखाताई मोहोळकर, सोलापूर जिल्हा प्रभारी बापूसाहेब बोराटे सोलापूर जिल्हा अध्यक्ष धनाजी जाधव, जिल्हा संघटक पोपट गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब गवळी, जिल्हा सचिव कल्याण माळी, जिल्हा संपर्कप्रमुख गणेश म्हेत्रे, जिल्हा युवा अध्यक्ष अनिकेत आदलिंगे, उपाध्यक्ष प्रदीप देवकर( माळी) त्यावेळी सर्व पदाधिकारी होते.
Comments
Post a Comment