विरवडे बु मध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर करत फुलला भक्तीचा सोहळा ...
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १३
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
मोहोळ तालुक्यतील सीनानदी काटी वसलेल्या विरवडे बु येतील अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज मोठया उत्साहात सांगता करण्यात आली. कै. ह.भ.प. तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री गुरुवर्य ह.भ.प. विठ्ठल दादा वासकर महाराज यांच्या प्रेरणेने हा सप्ताह अनेक वर्ष परंपरेनुसार चालत आलेला आहे . गेले आठ दिवस या सप्तामध्ये पारायण ,भजन प्रवचन, किर्तन रात्री, हरिजागर, तर पहाटे काकडा व आरती आदी कार्यक्रम झाले तर आठ दिवस सकाळी नास्ता व दुपारी संद्याकाळी जेवणाच्या पंगती होत्या. तर सप्तहाच्या शेवटच्या दिवशी रात्री 12 ते 5 जंगी भारुडाचा कार्यक्रम पार पडला. गावाला कोणतीही यात्रा किंवा उत्सव नसल्यामूळे गावकरी हा अखंड हरिनाम सप्ताहाच मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विरवडे गावात दिवाळी हा सण 15 दिवस साजरा करतात. हनुमान मंदिरावर व मंदिर परिसरात विदुत रोषणाई करण्यात आली होती ,
तर संपून गावातून ज्ञानोबा माऊली तुकाराम जयोघोषात हनुमान पालखी व दिंडी प्रदक्षणा घालण्यात आली पालखी मार्गावर रंगीळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. संपूर्ण गावातून दिंडी प्रदिक्षणा झाल्यानंतर जि. प प्राथमिक शाळेच्या मैदानात गोलरिंगण सोहळा पार पडला.या गोल रिंगण सोहळ्यामध्ये वयोवृद्ध भक्तांनी ही फुगडी खेळून आनंद साजरा केला. यापासून युरिया सोन्यामध्ये लहान-थोर वयोवृद्ध मंडळी सामील होत आनंद घेत होते. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली , हा अस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी गावातील लहान थोर मंडळी व पंचक्रोशीतील , शेजारील गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ,
Comments
Post a Comment