करमाळा तालुक्यातील कुंभारगावामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ५
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात कुंभारगाव येथे लोकनायक वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या सेवेने प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक रामभाऊ तरसे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला, गेल्या दहा वर्षापासून रामभाऊ हे पुणे येथे प्रहार च्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहेत.परंतु त्यांचे जन्मगाव करमाळा तालुक्यातील कुंभारगाव हे आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील अनेक रुग्णांना तसेच सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रामभाऊ तारसे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात काम करण्याचे ठरवले असून जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात करमाळा तालुक्यातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपल्या गावात केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ढोल ताशाच्या गजरात मध्ये करण्यात आलं.
अतिशय थाटामाटात भव्यदिव्य असा कार्यक्रम पार पडला .[]
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे पीए गौरव भाऊ जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये अंध अपंग अनाथ गोरगरीब शेतकरी यांना न्याय मिळवून देण्याचे काम बच्चुभाऊ करत आहे .. गोरगरीब जनतेची सेवा करणं आत्तापर्यंत कमीत कमी 10 हजार रुग्णांना कमी पैशांमध्ये ऑपरेशन करून दिलेले आहेत.
त्यावेळी आवर्जून आपल्या भाषणामध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रहार संघटनेचे काम दत्तात्रय भाऊ मस्के पाटील यांचे प्रगतीपथावर आहे कारण ज्या ठिकाणी गोरगरिबांची सेवा केली जाते .. प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून दिला जातोय.. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच प्रहार पदाधिकारी टीमचं कौतुक केलं..
यावेळी लोकनायक राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील ,रुग्णसेवक नयन भाऊ पुजारी, पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष अॅड. काळे साहेब दौंड चे तालुकाध्यक्ष रमेश शितोळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ, अमोल मानकर शिवशंभु वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ तरसे, मोहोळ चे तालुकाध्यक्ष आबासाहेब गुरव, उपाध्यक्ष नानासाहेब ननवरे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर करमाळा युवा तालुकाध्यक्ष विकी मोरे, करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर पवार ,सचिव प्रवीण मखरे, उपाध्यक्ष सोमनाथ जाधव व उपाध्यक्ष पप्पू ढवळे ,करमाळा तालुक्याचे नेते जालिंदर पानसरे ,भाऊसाहेब शेळके, तसेच करमाळा तालुक्यातील अनेक शेतकरी व प्रहार सैनिक तसेच प्रहारचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते..
Comments
Post a Comment