मोहोळ तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन वीज तोडणी मोहीम ताबडतोब बंद करन्याची मागणी



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १९ 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

वीज पुरवठा सुरळीत चालू केला नाही तर रस्ता रोको करणार. विजयराज डोंगरे

 दि.18 नोव्हें रोजी भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुक्याच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन आम्ही मोहोळ तालुक्याच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. आमच्या निवेदनाचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. तर येत्या 8 दिवसात आम्ही मोहोळ येथे रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. 

चौकट

गेले 2 वर्षे कोरोना, महापूर आणि इतर अनेक संकटांमुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. यातच राज्य सरकारने शेतकर्‍यांविरोधात वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. मोहोळ तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडले आहे. अगोदरच अनेक संकटांनी वेढलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नात आणखी भर घालण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर निदान त्यांच्या प्रश्नात भर तरी घालू नका. त्यामुळे आमची राज्य सरकारला विनंती आहे की ही वीज कनेक्शन तोडणी थांबवून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. 
मोहोळ विज वितरण कंपनीचे अधिकारी  तपकिरी साहेब यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी जि. प. सभापती मा. विजयराज दादा डोंगरे, भाजप नेते मा. संजय आण्णा क्षीरसागर,भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.बाळासाहेब पवार,  जि.उपाध्यक्ष मा.पांडुरंग बचुटे, जि. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष मा. लिंगदेव निकम, भाजपा मोहोळ विधानसभाध्यक्ष मा. दिलीप गायकवाड, तालुकाध्यक्ष मा. सुनील दादा चव्हाण, मोहोळ शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर,ता. सरचिटणीस मा. सतीश पाटील, मा. मुजीब भाई मुजावर, मा. महेश सोवनी, मा. गणेश झाडे,तालुका कोषाध्यक्ष मा. विष्णुपंत चव्हाण,मा. सुनील तात्या पाटील, मा. मोहन तात्या होनमाणे, मा.दीपक गवळी, मा.नागेश मेजर क्षीरसागर, मा.अविनाश पांढरे, मा.संजय वाघमोडे,अंबादास वाघमोडे, मा.युवराज शिंदे, मा.गणेश शिंदे,मा. दिलीप कदम, मा.प्रकाश काळे,मा. योगेश गोवर्धनकर,मा. केशव वाघचवरे,मा. सुशील मोटे मा. माऊली भगरे आदी सोबत भाजपा तालुका पदाधिकारी , कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न