काक्रंबावाडी येथील तरुण महेश कोळेकर यांनी राबवला एक अनोखा उपक्रम..
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
*तुळजापूर: दि.१९ नोव्हेंबर २०२१ रोजी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी या छोट्याशा गावातील तरुण महेश बजरंग कोळेकर यांनी राबवला एक अनोखा उपक्रम. चला एकत्रित येऊया, रस्ता सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन करूया.
आज या अनोख्या उपक्रमास लहान मुलांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. मुळात हा उपक्रमच लहान मुलांसाठी राबवण्यात आला होता. अंबुलन्स म्हणजे काय? अंबुलन्स चा उपयोग, अंबुलन्स चा वापर, अंबुलन्स ची संपूर्ण माहिती या लहान मुलांना लहान वयात देण्यात आली. लहानपणापासून आरोग्याची काळजी आणि आपल्या आरोग्या बरोबर इतरांच्या ही आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे शिकवले. प्रथमोपचार म्हणून काय काय करता येईल. रस्त्याचे नियम, ट्राफिक चे नियम समजावून सांगण्यात आले. आपल्या समोर रोडवरती अपघात झाल्यास काय करावे. कोणाला कसे बोलावे, मदत कशी मिळवावी, कॉल कसा आणि कोणत्या नंबर वरती करावा, डॉक्टर , नर्स यांच्याशी कसे बोलावे, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
ही लहान मुले उद्या आपल्या या भारत देशाची महत्वपूर्ण पिढी होतील आणि देशसेवेसाठी आणि देशकार्यासाठी सदैव तत्पर राहतील. आज चला एकत्रित येऊया आणि रस्ता सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन करूया या अनोख्या उपक्रमाचे आणि महेश बजरंग कोळेकर यांचे संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment