कार आणि कंटेनरचा भिषण अपघात एकाचा मृत्यू



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १३
प्रतिनिधी अमन सिडाम

(यवतमाळ).पांढरकवडा शहरापासून १० किलोमीटर अंतरावर  असलेल्या धारणा या गावाजवळ कार आणि कंटेनर याचा समोरासमोर अपघात होऊन यात कारचालक याचा जागीच मृत्यू झाला व ट्रक चालक हा किरकोळ जखमी झालेला आहे. तामिळनाडू येथील कंटेनर TN-96-E-2575 या क्रमांकाचा कंटेनर आग्रा येथून माचिस डब्बी माल  घेऊन नागपूर मार्गे तामिळनाडू कडे रवाना झाला असता धारणा येथे समोरुन येणारे  Mp-17-CC-0758 स्विफ्ट डिझायर पांढरा कलरची कार दुपारी 2 वाजताच्या दरम्यान  मध्यप्रदेश कडे  अत्यंत वेगात निघाली असता ड्रायव्हरचे कार वरील नियंत्रण सुटल्याने गाडी अत्यंत वेगात असल्याने डिव्हायडर क्रोस करून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकला धडक दिल्याने त्यात स्विफ्ट डिजायर चालक भोला प्रसाद शुक्ला वय 60 राहणार मध्य प्रदेश या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला पोलीस स्टेशन पांढरकवडा याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न