सोरेगाव गाव येथील पती पत्नीच्या अक्सिडेंट मध्ये मृत्यू...


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २३ 
कुरुल प्रतिनिधी: नानासाहेब ग्ला

दि.२३ रोजी  मोहोळ तालुक्यातील वडवळपाटी व कोळेगांव हद्दीत सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने मोटारसायकलला पाठीमागुन जोराने धडक दिल्याने मोटारसायकलवरील  पती -पत्नीचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवार  रोजी भर दुपारी सव्वा एकच्या दरम्यान घडली .

मृत व्यक्तीचे नावे अर्जुन नामदेव थिटे हे निवृत्त एस.आर.पी कर्मचारी असुन त्यांना उत्कृष्ठ कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक मिळाले होते .मृत अर्जुन थिटे यांच्या परिवारामध्ये एक मुलगा , सुन व दोन मुली आहेत" .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  मुळगांव कोंबडवाडी येथील  मयत अर्जुन नामदेव थिटे व अनिता थिटे हे दोघेही सध्या  सोरेगांव  येथे राहत असुन ते शेतीच्या कामानिमीत्त मुळगावी कोंबडेवाडी येथे गावी आले होते . शेतीमधील सर्व  कामे उरकुन परत सोरेगावला जात असताना  मोटार सायकल ( एम .एच.13 AK 7332  क्रंमाक  ) वरुन घराकडे परत जात असताना  मोहोळ हुन सोलापूर कडे जाणाऱ्या मालट्रकने ( क्रंमाक ए .पी .39  V 6829 ) पाठीमागुन जोराने धडक दिल्याने मोटार सायकल वरील  अर्जुन नामदेव थिटे  ( वय  ६५ ) व अनिता थिटे ( वय ६० ) हे दोघे पती पत्नीचा जागीच मृत्यु झाला .
 याबाबतची खबर पोलीसांना मयताचे पुतणे सचिन शंकर थिटे यांनी पोलीसांना दिली व मालट्रकच्या चालकास अटक करण्यात आली आहे . अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय माने करीत आहेत .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न