माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्ष युवापदी कमलाकर फुले यांची निवड.


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ७
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

लातुर:-माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या लातूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी कमलाकर फुले यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय भाऊ माळी ,व उपाध्यक्ष बालाजी माळी ,ज्ञानदेव जाधव व महाराष्ट्र राज्य युवा कार्याध्यक्ष महेश भाऊ गोरे, लीगल सेलचे अध्यक्ष नितीन राजगुरू साहेब वधुवर सुचक अध्यक्ष मुरलीधर भुजबळ, प्रदेश राज्य प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब ननवरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

सामान्यातील सामान्य माणूस सामाजिक सेवा करतो व त्याला त्याला सामाजिक क्षेत्राची आवड असते,  सतत समाज सेवा करत राहिले ते म्हणजे कमलाकर फुले होय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्राची आवड असणारे व  सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून पंचक्रोशीतील लोकांची कामे करीत आहेत.लोकांची सेवा करत प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण करून घेतली,प्रत्येकाच्या मदतीला कोणत्याही कामाला धावून जाणारे फुले यांच्या या कामाची दखल घेऊन माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी सामाजिक क्षेत्रातील आवड व सामाजिक कार्याची दखल पाहून लातूर जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष पदी कमलाकर बालाजी फुले 
 यांची निवड करण्यात आली व तसेच त्यांना परत एकदा समाज सेवेसाठी व समाज संघटन करण्यासाठी संधी निर्माण करून दिली आहे, आणि

त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कमलाकर फुले म्हणाले की माझी सेवा संघटनेने जी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार करून प्रत्येक खेडेगाव पर्यंत माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे काम पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले व संघटनेचे माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे ती नक्कीच यशस्वी होऊन दाखवणार आहे आणि तळागाळातील लोकांपर्यंत समाजाचा काम संघटनेचे काम पोचवणार असल्याचं त्यावेळी म्हटले आहे.

त्यांच्या या निवडी मुळे लातूर जिल्ह्यामध्ये व परिसरांमध्ये आनंदाचे वातावरण तिथे चर्चा चालू आहे का सामान्य कुटुंबाला व्यक्तीला संघटनेने जिल्हा युवा पद दिलं स्थरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत, व त्यांचे कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न