तालुक्यातील शिंगोली येथे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या शाखेचे धुमधडाक्यात उद्घाटन



*मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रहार ची इंन्ट्री

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ८ 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरेत

 राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या कार्यावर व विचारावर प्रेरित होऊन दि.07 /11/ 2021 रोजी शिंगोली नगरीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या उद्घाटन करण्यात आले .प्रहार शेतकरी संघटनेच्या मोहोळ युवक तालुकाध्यक्षपदी निसर्ग हॉटेल चे मालक नानासाहेब खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
त्यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आतापर्यंत एक लाख रुग्णांना मोफत सेवा दिली आहे. करू नका याचे संकटामध्ये सोलापूर जिल्ह्याचे आमदार घरांमध्ये लपून बसले होते.  सोलापूर जनशक्ती पक्ष व संघटनेचे सोलापूर टीम अहोरात्र काम करत होती.कॉल आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी पोचुन सेवा देण्याचे काम करत होती.
लोकनायक वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या सेवा त्याग समर्पण संघर्ष या विचार प्रणाली ची मशाल घेऊन गेल्या पाच वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी अहोरात्र झटत प्रहारची शाखा प्रत्येक गावात घेऊन जात असून गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता याप्रमाणे काम करत आहे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी ,यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात शहर असुदे ग्रामीण भाग असुदे प्रत्येक ठिकाणी प्रहारचा कार्यकर्ते तयार होत असून प्रहारमध्ये युवकांची गर्दी वाढत चालली आहे याचीच प्रचिती आज जिल्ह्यात येत आहे.मोहोळ तालुक्यातील शिंगोली गावातील शेकडो युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करत शाखेचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
   यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष वैभव जावळे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विशाल सपकाळ,औद्योगिक तालुकाप्रमुख नितिन भोरे, जनशक्ती पक्ष मोहोळ तालुका अध्यक्ष आबासाहेब गुरव, तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख विशाल मासाळ, दक्षिण सोलापूर तालुका संपर्कप्रमुख अभिमान घंटे तालुका उपाध्यक्ष समर्थ गुंड  , तालुकाध्यक्ष नानासाहेब खांडेकर, सामाजिक कार्यकता श्रीधर पाटील,आबा पाटील, अभिषेक पाटील ,दिनकर पाटील, अमर घोडके ,तिरुपती हक्के ,सचिन घोडके ,दिलीप राठोड ,शरद बारडोळे ,गणेश बळवंतराव ,रोहण उघडे ,आनंद खरात ,भारत घोडके, बलभिम रासेराव ,सुदर्शन कस्तुरे, शिवाजीराव खांडेकर, राम वाघमारे, महेंद्र डोंबाळे ,नीलकंठ कानडे, अण्णासाहेब कुंभार  ,राजमाता हॉटेल चे मालक तायाप्पा गावडे, केशव सुतार, पांडूरंग दावणे, श्रिमंत कदम, प्रभाकर महामुनी, महादेव खटके.राहूल मोटे.यशवंत खाडेकर. रमेश खाडेकर. विकस रासेराव.पंडित रासेराव.महेश गोफणे यांच्यासह अनेक शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते पदाधिकारी व शिंगोली ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न