जनशक्ती संघटनेच्या मागणीला यश*अखेर शेतक-यांची पिळवणुक करणा-या प्रथम लिपिक अतुल जोशी यांची जालन्याला बदली

जनशक्ती संघटनेच्या मागणीला यश

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ९ 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

 औरंगाबाद-गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास  महामंडळांतर्गत लघुपाटबंधारे विभाग क्रमांक एक मध्ये कार्यरत असलेले प्रथम लिपिक अतुल जोशी हे गेल्या आठ वर्षापासून कार्यरत आहे विभागामार्फत शेतकऱ्यांचे भूसंपादन केले जाते या कामात शेतकऱ्याकडून टक्केवारी घेतल्याशिवाय जोशी हे धनादेश त्यावर सह्या करत नाही पैसे न देणाऱ्या शेतकऱ्यांचे धनाच्या धनादेशावर जाणून बुजून चुकीचे लिहिले जातात पैसे दिल्याशिवाय ते दुरुस्त केले जात नाही हिरडपुरी बंधारा देवगाव रंगारी शिवना टाकळी प्रकल्पाच्या भूसंपादनाला आदिवासी शेतकर्‍यांची अडवणूक करून पैशाची मागणी करत असतात.
     अतुल जोशी हे एकाच ठिकाणी महत्त्वाचा टेबलावर गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत होते जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत तत्कालीन कार्यकारी अभियंता अनिल लिंबोरे यांच्याशी संगनमत करून त्यांनी मोठ्या प्रमाणात बोगस बिले काढली आहेत याशिवाय ते स्वतः इतरांच्या नावे ठेकेदारी करीत असतात निविदा प्रक्रिया सारखा मलिदा मिळविणारा टेबल ते सांभाळतात आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे द्यावीत यासाठी ते अधिकाऱ्यांवर दबाव वापरत असतात मला कामे दिले नाही तर इतरांना कामे मिळू देणार नाही अशी काही धमक्या देत असतात.
    अतुल जोशी यांनी लघुपाटबंधारे विभाग क्रमांक 1 मधील कार्यकाळातील देयकाची विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून बेहिशोबी मालमत्ता कमावलेले आहे त्याचीही सखोल चौकशी व्हावी असे जनशक्ती संघटनेचे प्रदेश महासचिव रऊफ एन पटेल यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे दि.८ आॅक्टोंबर रोजी लेखी तक्रार केली होती त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न