शेती पंपाची लाईट सुरळीत करा अन्यथा प्रहार महावितरण समोर ठिय्या आंदोलन करणार !
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २०
मोहोळ प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
सध्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने शेतकरी बांधवांना वेठीस धरलेले आहे. आणि थकित वीजबिला पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत.आणि ही कनेक्शन तोडून आणखीन जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणीत ढकलले जात आहे.
एकतर या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्या मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे.यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रमुख पीक मानले जाणारे ऊस पीक अजून कारखान्याला गेलेले नाही.आणि गेल्यावर्षी गेलेल्या उसाची अजूनही काही कारखान्यांनी उसबिले दिलेली नाहीत.मग शेतकरी वीजबिल कोठून भरणार! असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे उत्तर सोलापूर तालुकाप्रमुख विशाल सपकाळ यांनी केला आहे. तरी शेतकऱ्यांची वीज सुरळीत करून विजतोडणी तात्काळ थांबवावी अशी मागणी प्रहार च्या वतीने करण्यात येत आहे.
ही मागणी वीजवितरणने मान्य न केल्यास प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर येथील मेन महावितरण कार्यालयासमोर समोर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र ठिय्या आंदोलन केले जाईल .
[] विशाल सपकाळ (प्रहार शेतकरी नेते) सध्या महावितरणने शेतकऱ्यांना वीजबिलासाठी वेठीस धरू नये.सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.एक तर यंदा अतिृष्टीमुळे शेतकऱ्यांची खरीप पिके वाया गेलेली आहेत.आणि मुख्य पीक असणारे ऊस पीक अजून कारखान्याला गेलेला नाही.आणि गेल्या वर्षी च्या उसाची बिले अजूनही काही कारखानदारांनी दिलेली नाहीत.यामुळे शेतकऱ्यांना महावितरणने वेठीस धरू नये अशी मागणी केली आहे
Comments
Post a Comment