सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांच्या ऊस काटे मारी विरुद्ध सोलापूर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक.



शेतकऱ्यांची ऊस वजन काट्या संदर्भात पुराव्या निशी लेखी तक्रार आली तर गाठ प्रहार शी : जिल्हाप्रमुख दत्ता भाऊ मस्के- पाटील

  पुज्यनगरी ऑनलाईन न्यूज दि २५
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 

 प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांच्या नेतृत्वात प्रहारच्या समितीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांची भेट घेत सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखानदारांकडून होत असलेल्या काटा मारी विरुद्ध त्यांच्या दालनात शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी,शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार,यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेत जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काटा मारून त्यांच्यावर अन्याय करणारे कारखानदारांच्या विषयी साहेबांशी चर्चा करून रीतसर निवेदन देण्यात आले.
   यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा होऊन संबंधित कारखानदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकऱ्यांनी बाहेरून कुठून हे काटा करून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला घालावा आणि यात जर कोणत्या कारखानदारांनी अडथळा केला तर जिल्हा प्रशासनाने यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि तसे नाही झाले तर शेतकऱ्यांनी जिथे जिथे अशा बाबी उघडकीस येतील न भिता प्रहार जनशक्ती पक्षाशी संपर्क साधावा असे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांनी सांगितले जिथून जिथून अशा प्रकारचा शेतकऱ्यांवर अन्याय केला जाईल त्या कारखान्याच्या चेअरमन ची गाडी सोलापूर जिल्ह्यात प्रहार रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दत्ता भाऊ मस्के पाटील यांनी यावेळी दिला.
  यावेळी दक्षिण चे तालुकाध्यक्ष मोसिन तांबोळी,उपाध्यक्ष समर्थ गुंड उत्तर चे तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ,फिरोज पठाण, मोहोळ चे तालुकाध्यक्ष वैभव जावळे,मोहोळ युवक तालुकाध्यक्ष नानासाहेब खांडेकर, करमाळ्याचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव,सागर गुंड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न