केम गावचे सुपुत्र सोमनाथ गरदडे B.S.F. मध्ये २० वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीने सत्कार


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ४ 
मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

 केम गावचे सुपुत्र सोमनाथ गरदडे बीएसएफ मध्ये देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल केम गावातील नागरिकांच्या वतीने व व्यापारी संघटना व इतर राजकीय पक्ष व संघटना यांच्या वतीने  सत्कार आयोजित करण्यात आला.*
  करमाळा तालुक्यातील केम गावचे सुपुत्र सोमनाथ गरदडे हे गेल्या अनेक वर्षापासून सीमा सुरक्षा दल बी.एस.एफ. मध्ये कार्यरत होते आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या भारत देशाची सेवा स्वतःचे प्राण पणाला लावून केली. करमाळा तालुक्यातील तसेच केम गाव आणि परिसरातील सर्वच भागातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.आणि तरुण पिढीला आदर्श म्हणून ही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या देश सेवेबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर व केम गावचे सर्व व्यापारी संघटना व इतर राजकीय सामाजिक पक्षातील पदाधिकारी नागरिक यांनी मिळून आज दिनांक 3  नोव्हेंबर रोजी केम गावात त्यांचा जाहीर सत्कार  करण्यात आला .

त्या वेळी बोलताना सेवानिवृत्त सैनिक सोमनाथ गरदडे म्हणाले की मी वीस वर्षे देशाची सेवा करायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो यापुढेही समाज सेवा व देशाची सेवा करणार आहे .माझ्या २० वर्षाच्या सेवेमध्ये माझ्या कुटुंबाचा व  मित्र परिवाराचा महत्त्वाचा त्याग आहे . त्यामुळे मी देशाची सेवा करून घरी सुखरूप परत आलो आणि सेवानिवृत्त झालो. असाच आशीर्वाद सर्वांचा माझ्या पाठी राहो .या वेळी गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींकडून त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या.

   यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, गावचे माजी सरपंच अजित दादा तळेकर, केम गावचे सरपंच आकाश भोसले, उपसरपंच नागनाथ तळेकर गुरुजी, गावचे केम् ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर राजे दौड, युवा सेना अध्यक्ष सागर राजे तळेकर, भाजप केम शहराध्यक्ष गणेश आबा तळेकर , गावचे युवा नेते महावीर आबा तळेकर, बापू नेते तळेकर, केम् गावचे सुपुत्र पी एस आय . म्हणून कार्यरत असलेले जालिंदर जाधव साहेब, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संपर्क प्रमुख सागर भाऊ पवार गोटू बोंगळे, प्रहार करमाळा तालुका सचिव प्रवीण मखरे, जाणता राजा स्पोर्ट क्लब अध्यक्ष समीर भाऊ तळेकर, धर्मवीर संभाजी मंडळाचे अध्यक्ष उमेश पाडूळे,रोहित तळेकर,  ओंकार जाधव,सचिन जाधव, मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, आजिनाथ जाधव गुरुजी ज्योतीराम तळेकर गुरुजी ,चेतन जाधव,  बँक ऑफ इंडिया मॅनेजर राहुल तळेकर, बाळासाहेब तळेकर ,ग्रामपंचायत सदस्य अनंता तळेकर ,मावळा ग्रुप अध्यक्ष दत्ता भाऊ तळेकर  ,अभिजीत तळेकर , महेश तळेकर,विजय तळेकर, धनंजय चव्हाण ,ज्ञानेश्वर तळेकर, दीपक भिताडे,गणेश तळेकर, अनेक असंख्य सर्व राजकीय व सामाजिक केम ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न