रुई गावातील गरीब व्यक्तीला ऑपरेशनसाठी दिपक लांडगे यांच्या माध्यमातून 10 हजार रुपयांची मदत.
पुज्य नगरी ऑनलाईन न्युज दि ३
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
गोरगरिबांच्या शेतकऱ्याचे अपंगांचे निराधारांचे दैवत ओम प्रकाश बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शना मधून गरजवंतांना मदत सहकार्य प्रत्येकाच्या हाकेला धावून देणारे प्रहार जनशक्ती पक्ष माढा तालुका उपाध्यक्ष व रुग्णसेवक दीपक लांडगे प्रत्येक वेळेस आपल्या हातून समाज कार्य घडत राहो..
कारण रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन त्यांना विविध माध्यमातून मदत मिळवून देणारे दीपक भाऊ लांडगे..
सर्वसामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती रुई मधील बायपास सर्जरी साठी मदत हवी आहे म्हणून कारण आर्थिक परिस्थिती आमची नाही. त्यावेळी मसोबा ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याकडे त्यांची व्यथा मांडल्यानंतर आमच्या ट्रस्टच्यावतीने दहा हजाराची मदत देतो.. आणि त्या कुटुंबियांना रूप दहा हजार रुपये ची रक्कम देण्यात आली.
माननीय नामदार बच्चु भाऊंच्या सेवा त्याग समर्पण या प्रणालीनुसार मौजे रुई तालुका माढा येथील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील महादेव घाडगे यांचे बायपासचे ऑपरेशन बारामती येथील गिरीराज हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत होणार असून त्यांना मेडिकल आणि इतर तपासण्यासाठी म्हसोबा देवस्थान ट्रस्ट रुई च्या माध्यमातून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत व्हावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाचे माढ तालुका उपाध्यक्ष /रुग्णसेवक दीपक लांडगे यांनी मसोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन अनिल झिंजे भेट घेऊन त्यांना गरीबांची व्यथा मांडल्यानंतर नक्कीच मदत करु आणि लगेच दहा हजार रुपयांची मदत केली .आणि त्यांनी कमिटीला विचारात घेऊन दहा हजाराची मदत केली यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक व्यंकटराव जरक, माजी सरपंच बाळासाहेब झेंडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे माढा तालुका उपप्रमुख आणि रुग्णसेवक दीपक लांडगे, म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन अनिल झिंजे, शिंदे , शालनभाई मुलांनी उत्तम सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment