कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी अडचणीत नेमके शेतकऱ्यांनी कोणते पीक पिकवावे म्हणजे भाव मिळेल : विशाल सपकाळ


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूॅज दि २
मोहोळ (प्रतिनिधी)  नानासाहेब ननवरे  
सध्या शेतकऱ्यांचे नवीन कांदा चालू झालेला आहे.आणि लगेच कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे.केवळ २००-८०० रुपये कवडी मोलाच्या दराने विकावे लागत आहेत. एक तर कांदा पिकाला या वर्षी खूपच खर्च झालेला आहे. कसं बस हातात आल्याला पण भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.आणि मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यातच ओला दुष्काळ निधीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्णपणे जमा झालेला नाही. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. तर अशा या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या मालाचा कमी भाव झाल्यावर शेतकऱ्यांनी काय करावे?आणि नेमके कोणते पीक घ्यावे असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख विशाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
          अहोरात्र कष्ट करूनही शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोलाची किंमत मिळत आहे.शेतकरी अहोरात्र मेहनत करत आहे.सरकारला या गोष्टीची काही पर्वा नाही.शेती हा आपल्या भारत देशाचा कणा आहे , तो कणा या कवडी मोलाच्या किमती मुळे मोडखळीस आला आहे.तरी कांदा दरात वाढ करावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे युवा नेते विशाल सपकाळ यांनी केलेली आहे.
चौकट: विशाल सपकाळ (प्रहार उत्तर अध्यक्ष) :* सध्या कांद्याचे पडते दर पाहता अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत आहेत.कारण जेव्हढा खर्च केलेला आहे तेव्हढा ही त्याचा मोबदला सुद्या निघेना झालाय.यामुळे शेतकऱ्यांना नेमके कोणते पीक घ्यावे जेणेकरून त्याला त्याचा मोबदला तर  मिळेल हेही कळेना झालायं..

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न