प्रहार संघटनेच्या प्रयत्नाला यश ड्रेनेज मध्ये गुदमरून मृत्यू झालेल्या मजुराच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २४
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ड्रेनेज मध्ये गुदमरून मृत्यू झालेल्या मजुराच्या वारसांना प्रहारच्या लढ्यामुळे प्रत्येकी दहा लाख रुपये मदत..
काल रात्री सोलापूर अक्कलकोट महामार्गालगत मल्लिकार्जुन नगर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या ड्रेनेज लाईन मध्ये काम करते वेळी उत्तर प्रदेशातून आलेल्या चार मजुरांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला होता,या प्रकरणानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सर्व प्रहारची टीम आज सकाळपासून मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी आक्रमक होऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मधील जर भरपाई दिली नाही तर संबंधित मजुराचे प्रेत महापालिकेत आयुक्त कार्यालयाच्या पुढे नेऊन ठेवले जाईल असे सांगितले होते.
[] यावेळी अधिकचे बोलताना शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांनी सांगितले जर मृतांच्या नातेवाईकांना दिलेला दहा लाखाचा शब्द महापालिका आयुक्तांनी पाळला नाही तर प्रहार आणि महापालिका आयुक्त यांच्यात समोरासमोर जे घडेल त्याला पूर्णतः महापालिका प्रशासन जबाबदार राहील, त्यानंतर आमच्यावर,कोणते गुन्हे दाखल करायचे ते करा असेही सांगितले*.
धर्माधर्मात प्रांता-प्रांतात जाती-जातीत भांडणे लावून राजकारण करणाऱ्या इतर पक्षांनी सुद्धा प्रहारच्या या आंदोलनाचा बोध घ्यावा उत्तर प्रदेशातील मजुरांसाठी सोलापूर शहरातील प्रहार संघटना आक्रमक होते यापेक्षा दुसरी मोठी सामाजिक बांधिलकी असूच शकत नाही,असे मत जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी आंदोलनानंतर व्यक्त केले.
यामुळे अखेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनापुढे महानगरपालिकेला झुकावे लागले आणि संबंधित मजुरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख अशी एकूण 40 लाख रुपये देण्याचे महापालिका आयुक्त व महापौर यांनी तात्काळ कबूल केले,यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार शहर उपाध्यक्ष मुदस्सर हुंडेकरी दक्षिण सोलापूर चे तालुकाध्यक्ष मोहसीन भाई तांबोळी,विद्यार्थी संघटनेचे नागेश घाडगे,अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment