माढा तालुक्यात आलेगावं खुर्द येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या भव्य शाखेचे दिमाखात उद्घाटन.
कोंढार भागातील शेकडो तरुणांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे :
सर्वसामान्याचे नेते दीनदुबळ्या चे आधार,अपंगाचे दैवत कष्टकरी शेतकरी निराधारांच्या आधार विधवा माता-भगिनी यांचे पालन हार सर्वसमावेशक लोकनायक,मा,नामदार बच्चु भाऊ यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घघाटन प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील,यांच्या मार्गदर्शनात व सोलापूर शहराध्यक्ष,अजित भाऊ कुलकर्णी यांच्या शुभहस्ते,माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे यांच्या नेतृत्वात जल्लोषात करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर उपाध्यक्ष,रमेश भाऊ पाटील,प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर आलेगाव खुर्द चे माजी सरपंच प्रदीप गायकवाड हरिभाऊ माने,जिल्हा संघटक दीपक नाईक नवरे जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील,जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे,माढा कार्याध्यक्ष संतोष कवले,माळशिरस अपंग क्रांती चे तालुकाध्यक्ष गोरख जानकर संपर्कप्रमुख शहाजी देशमुख पिंटू भोसले माळशिरस तालुका चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पोळ,दामुअण्णा माने, आलेगाव शाखा अध्यक्ष रामदास माने,उपाध्यक्ष तानाजी गायकवाड अध्यक्ष डॉ,अरविंद गायकवाड, सचिव रामचंद्र गायकवाड विजय शिंदे शाखेचे सर्व पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्षाचे रुई शाखेचे सर्व पदाधिकारी आलेगाव खुर्द आलेगाव बुद्रुक शाखेचे सर्व पदाधिकारी कोंढार भागातील प्रहारचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील म्हणाले कोंढार भागातील जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून जो अनेक वर्षाचा आणि अनेक गावांसाठी उपयुक्त असलेला कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा प्रश्न आलेगावकर यांचे हितासाठी नामदार बच्चुभाऊ कडू महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आणि उजनी धरणातून पुनर्वसित होऊन या गावात आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार.
Comments
Post a Comment