लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षापासून केले शारीरिक संबंध, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
यवतमाळ :- झरीजामणी तालुक्यातील गुलाब लक्ष्मण मेश्राम वय 26 वर्ष राहणार खापरी यांने जानेवारी २०१८ पासून लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षापासून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता त्यावरून त्यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस सूत्रनुसार मिळालेल्या माहिती नुसार गुलाब लक्ष्मण मेश्रम वय 26 वर्ष रा खापरी यांने जानेवारी 2018 मध्ये येऊन फिर्यादीला माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर तुझ्यासोबत लग्न करीन असे म्हणून वारंवार फिर्यादीशी शारीरिक संबंध केले तसेच एक जानेवारी 2020 मध्ये फिर्यादीला पुण्यावरून परत म्हणून फिर्यादीचे आई-वडिलांना विश्वासात घेऊन तुमच्या मुली सोबतच लग्न करणार असे सांगून तिचे घरी नियमितपणे येऊन फिर्यादीशी शारीरिक संबंध करीत होता.
24 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान आरोपी गुलाब ने तिचे घरी येऊन एकटी असताना फिर्यादीशी शारीरिक संबंध केले व तिला माझे आई-वडील माझ्या लग्नाची घाई करीत आहे तर तू लग्नाची मागणी करायला माझ्या घरी पाहुणे पाठव असे सांगितले तेव्हा फिर्यादीने पाहुणे पाठविले असताना त्यांने लग्नास नकार दिला व फिर्यादीशी बोलणे बंद केले.
गुलाब ने फिर्यादीची फसवणूक केली असून तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार फिर्यादीशी शारीरिक संबंध केले त्यावरून जबानी रिपोर्ट दिल्यावरून पाटण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी अपराध क्र१३८/२१ नुसार कलम ३७६ .३७६(२) एन४१७ भादवि नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करीत आहे..
Comments
Post a Comment