कारच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार पिंपळखुटी येथील घटना
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
दिनांक 19 डिसेंबरला दुपारी 11: 40 वाजता दुचाकीला कार ने जोरदार धडक दिल्याने श्रीनिवास भुमन्ना आरपेल्लीवार वय 32 रा किनवट हा जागीच ठार झाला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास पिंपळखुटी येथून वळण मार्गाने होंडा शाइन क्रमांक TS 01 EL 6241 ने आदिलाबाद कडे निघाला होता ,त्याच वेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर नागपुर वरून आदिलाबाद कडे जाणाऱ्या सियाज मारुती क्रमांक एम एच 31 EW 3018 ने मागून जोरदार धडक दिली ,धडक इतकी जोरदार होती की श्रीनिवास ला डोक्यावर जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला.मृतकाला शवविच्छेदन करिता शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले ,पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमराज कोळी ,जमादार वसंता चव्हाण, करीत आहेत
Comments
Post a Comment