▪️'जनशक्ती'बाबत तोंड सांभाळून बोला : दीपाली डिरेंचा इशारा


आंदोलन 'जनशक्ती'चे; मात्र 'राष्ट्रवादी कडून श्रेय घेन्याचा प्रयत्न  

प्रतिनिधी:  नानासाहेब ननवरे 
पुज्य नगरी ऑनलाईन न्युज : 

 केतुर-पारेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मयत झालेले नागनाथ पतुले यांच्या नावे 4 लाख 22 हजार रुपये ठेव रक्कम आहे. ही रक्कम प्रामुख्याने बँकेमध्ये खातं काढताना ज्याचे नाव वारस म्हणून लिहिले आहे. त्यांना मिळणे प्राधान्यक्रम आहे. 
परंतु केतुर-पारेवाडी येथील डीसीसी बँकेमधील शाखाधिकारी दिलीप गोरे यांनी मयत नागनाथ पतुले यांच्या वारसाला पैसे देण्यासाठी सात महिने टाळाटाळ केले .
व  तुले कुटुंबियांना जाणीव पूर्वक त्रास दिला. या अन्यायाच्या विरोधात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला अनेक पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला. वैयक्तिकरित्या अनेकांनी भेटून मार्गदर्शन केले. मात्र हनुमंत मांढरे नावाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आंदोलनस्थळी येऊन फोटोसेशन करून गेला. भले ही चार - दोन फोन लावले असतील. मात्र फोटोसेशन करत श्रेय घेन्याचा प्रयत्न करीत आहे .
 जनशक्ती संघटना व अतुल भाऊ बाबत तोंड सांभाळून बोलावे अन्यथा मस्ती जिरवायला उशीर लागणार नाही अशा शब्दात जनशक्ती च्या महिला नेत्या तथा आंदोलक दिपाली डेरी यांनी समाचार घेतला.
 याबाबत अधिक माहिती अशी की, केतुर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी गोरे हे  पतुले कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास देत होते. मयत नागनाथ पतुले यांच्या पैशासाठी वारस असलेल्या त्यांच्या पत्नी गुणाबाई पतुले ह्या त्यांच्या सात मुलींसह मंगळवार दि. 30 नोव्हेंबर 2021 पासून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आमरण उपोषणासाठी बसलो होते. या आंदोलनासाठी जनशक्ती चे संस्थापक अतुल खूपसे पाटील वारंवार सूचना आणि मार्गदर्शन करत होते. शिवाय वरिष्ठांना फोनवरून संपर्क देखील साधत होते. 
या आंदोलना दरम्यान अनेक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. शिवाय या बाबत मार्गदर्शन देखील केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे  हनुमंत मांढरे  कार्यकर्ता आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आले  व फोटोसेशन केला. मात्र पुढे जाऊन त्याने वेगळ्याच अफवा पसरविल्या.  त्यामुळे संतापलेल्या दीपाली ढेरे यांनी मांढरे याचा खरपूस शब्दात समाचार घेतला. 

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न