संत गाडगेबाबा पुण्यतिथीचा औचित्याने सत्यपाल ची सत्यवाणी.कोरोना योद्धा व मान्यवरांचा सत्कार.



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी  अमन वाघु सिडाम

 संत गाडगेबाबा पुण्यतिथीच्या औचित्याने पाटणबोरी येथे  सत्यपाल महाराजांची सत्यवानी व कोरोना योध्दा व मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

संत गाडगेबाबा यांचे विचार आजच्या तरुण पिढीला कळावे व त्यांनी ते आत्मसात करावे तसेच सर्वांना गाडगेबाबा यांचे कार्य समजावे त्या अनुषंगाने त्यांच्या कार्याची उजळणी व्हावी म्हणून महाराष्ट्र भूषण, प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे  सत्यपालाची सत्यवाणी कीर्तनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ (सर्वभाषिक) शाखा पाटणबोरी ता. केळापूर जिल्हा यवतमाळ येथील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी कडाक्याच्या थंडीत परिसरातील हजारो संतप्रेमी मंडळी उपस्थित होती. यावेळी सत्यपाल महाराजांचे हस्ते  महासंघाचे संघाचे संस्थापक अध्यक्ष देवराव सोनटक्के यांचा समाजभूषण म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी  रूकेशजी मोतीकर (प्रदेश समन्वयक), भैय्याजी रोहणकर (प्रदेश उपाध्यक्ष),  अशोकराव क्षीरसागर (प्रदेश सचिव),राजुभाऊ तुरणकर (विदर्भ महासचिव), पुरुषोत्तम लोखंडे(नागपूर शहर उपाध्यक्ष) निता उप्परवार सरपंच ग्रामपंचायत पाटणबोरी,अंकित नैताम माजी आरोग्य सभापती न.प.पांढरकवडा,गजानन सिंगेवार भाजपा शहर अध्यक्ष,विलासरावं वाघमारे शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.या प्रसंगी श्रीराम खैरे स्वच्छतादुत ह्यांचे समाजा तर्फे सत्कार करण्यात आला व  कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या  स्थानिक ३४ लोकांचा कोरोना  योद्धा म्हणून देखील सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे यशस्वी करिता सचिन पत्रकार (तालुका प्रमुख), गजानन पत्रकार (अध्यक्ष), रामदास दख्खनकर (उपाध्यक्ष), अशोक तुरणकर (सचिव), राजेश आरपेल्लीवार सहसचिव, गजानन कात्रजवार कोषाध्यक्ष, सचिन मुके सहकोष्याध्यक्ष  तर सदस्य नरेंद्र पाथरकर, वसंत मुके, रमेश पत्रकार, देविदास पत्रकार, अशोक केळवतकर, ईश्र्वर शिरपुरकर, प्रभाकर केळवतकर, विनोद नाईक, संतोष शिरपूरकर, सतीश मुके, दिपक तूरणकर, गजानन चिंचोलकर, गजानन भुरे,विजय नागरकर ,रोहित तूरणकर, राहुल पत्रकार यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न