शिवणी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा गुंड तर उपाध्यक्षपदी पूजा गुंड यांची निवड
उत्तर सोलापूर,(प्रतिनिधी) आज दिनांक 28 रोजी जि प प्राथमिक शाळा शिवणी येथे शालेय व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली.सदर सभेमध्ये कृष्णा पांडुरंग गुंड यांची अध्यक्षपदी तसेच पूजा ज्ञानेश्वर गुंड यांची उपाध्यक्ष पदी म्हणून निवड करण्यात आली. तर नूतन शिक्षण तज्ञ म्हणून विशाल श्रीराम सपकाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत मधून विजया शिवाजी गुंड व शिक्षक प्रतिनिधी म्हणून नागनाथ मल्लाव सर यांची निवड झाली. याप्रसंगी सरपंच प्रशांत राखे,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय गुंड, माजी उपसरपंच युवराज गुंड,शाळा व्यवस्थापन सदस्य संदीप गुंड,शशिकांत गुंड,नितिन भो रे,सागर गुंड यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य मीना गुरुनाथ गुंड ,गीता बालाजी गुंड,सुरेखा काकासाहेब कदम,अनिल कमलाकर गुंड,भाग्यश्री प्रशांत राखे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बसवेश्वर येळदरे यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना कार्य व जबाबदाऱ्या याची पूर्ण माहिती सर्व उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना दिली .शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका रंजना चोरमले मॅडम व प्रशांत वर्धमाने सर,नागनाथ मल्लाव,अपर्णा तुळजापूरकर यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment