मोहोळ तालुक्यातील तलाठ्यांच्या संपामुळे प्रहार संघटना आक्रमक.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २९
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
: मोहोळ तालुक्यातील तलाठी संपावर असल्यामुळे शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना संप चालू केल्यापासून बिनपगारी करण्यात यावे अन्यथा अंदोलन करन्यात येईल असा इशारा प्रहारच्या वतीने देन्यात आला आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी जनता दरबारामध्ये एकुरके येथील तलाटी साळुंखे यांच्यावर आरोप केला होता . यामुळे तलाठी संघटनेने जो पर्यंत उमेश पाटील माफी मागत नाहीत. तोपर्यंत संप चालू राहिल अशी ठाम भुमीका घेतली आहे.
पण तलाठी व उमेश दादा पाटील या दोघांच्या भांडणामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षाणीक आणि शेतकर्यांचे विविध योजनेसाठी लागणारे दाखले न मिळल्याने शेतकर्यांचे ही नुकसान होत आहे त्यामुळे हे भांडण बाजूला ठेवून तलाठी यांनी 4 दिवसात कामावर हजर राहावे. अन्यथा तलाठी यांच्याविरोधात मोहोळ तहसील कार्यालयासमोर प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन मोहोळ चे तालुका प्रमुख वैभव जावळे यांनी मोहोळ चे तहसीलदार यांना दिले आहे
यावेळी तालुका प्रमुख वैभव जावळे अपंग क्रांती तालुकाध्यक्ष मनोज धोत्रे, संदीप माने विठ्ठल नलवडे व शेतकरी उपस्थित होते
Comments
Post a Comment