चाळीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला कोण जबाबदार..अतुल खुपसे पाटील यांचा सवाल


 पुज्यनगरी ऑनलाईन न्युज : दि ३ 
प्रतिनिधी  नानासाहेब ननवरे

 राज्यातील एस.टी. कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर असून गेल्या पंधरा दिवसापासून ते आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. मात्र याची कोणतीच दखल परिवहन मंत्र्यांनी घेतली नसल्याने 'जनशक्ती'च्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी बाहेर काळी शाई फेकून निषेध व्यक्त केला असून या प्रकरणी त्यांना काल दि.23 नोव्हेंबर रोजी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे कार्यकर्ते बाबाराजे कोळेकर, रोहन नाईकनवरे, अमोल चव्हाण, अनिरुद्ध हिंगे, ओंकार शेलार यांनी काल दि. 23 नोव्हेंबर रोजी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी व एसटीच्या विलीनीकरणासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर ३५३, १४१, १४३, १४५, १८८, १४९, १३५, ३७(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 दरम्यान आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता
मॅजिस्ट्रेट ( दंडाधिकारी) किल्ला कोर्ट यांनी एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आंदोलक आरोपीतर्फे ॲड सदानंद गुणवंत सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. विशाल जाधव, ॲड.गुरुनाथ आईर, ॲड . प्रदिप झा यांनी काम पाहिले.
▪️ चौकट
चाळीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला कोण जबाबदार..?
- एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय - हक्कासाठी गेली पंधरा दिवस आझाद मैदानावर शेकडो कर्मचारी आणि कार्यकर्ते ठाण मांडून आहेत. चर्चा करण्यासाठी सरकार पक्षातील एक ही मंत्री आझाद कडे फिरकला नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी आणि लोकशाही पद्धतीने निषेध व्यक्त करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्र्याचे गेटवर काळे फेकले तर त्यांच्यावर 'शासकीय कामात अडथळा' यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले. मग तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या 40 बांधवांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार कोण आहे..? शासनातील कोणत्या मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा..? शासनातील कोणता मंत्री त्यांची भरपाई देणार..? असे सवाल जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न