डॉ. प्रियंका बेंडाळे यांचा सामाजिक कार्याबद्दल राज्यपाल मा.भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मान.
डॉ. प्रियंका बेंडाळे यांचा सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतूक
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ६ डिसेंबर
प्रीटी यु फौंडेशन, नासिक च्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेऊन तसेच रुग्णसेवेचे व्रत अंगीकारून सतत कार्यमग्न राहणाऱ्या गणेश नगर येथील डॉ. प्रियंका बेंडाळे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते पुरस्कारा देण्यात आला.
डॉ. प्रियंका बेंडाळे यांनी ग्रामीण भागातील मुली, तसेच महिलांसाठी मासिक पाळी विषयी जागृती करण्यासाठी व्याख्याने दिली तसेच ग्रामीण भागातील मुलींना वर्षभर पुरेल इतका सेनेटरी पॅड चे वाटप केले. ग्रामीण भागातील लोकांसाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करून मोफत उपचार करणे तसेच औषधी वाटप केले.
त्रिंबकेश्वर तालुक्यातील तसेच पेठ तालुक्यातील दुर्गम भागात वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन केले. तसेच ग्रामीण भागातील आश्रम शाळेमध्ये लागणाऱ्या गोळ्या औषधे तसेच मुलींसाठी सेनेटरी पॅड चे वाटप केले, मासिक पाळीतील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामीण भागातील लोकांना गरजेचे साहित्य वाटपाचे कार्यक्रम घेतले. निसर्ग संरक्षणासाठी वृक्षारोपनाचे कार्यक्रम घेतले आहेत. कोरोना काळात अन्न धान्य वाटप, रुग्णसेवा, गरजूंना साहित्य वाटप, इत्यादी उपक्रमांद्वारे समाज सेवा सुरुच ठेवली. त्रिंबकेश्वर येथे यात्रेसाठी पायी येणाऱ्या वारकऱ्यासाठी मेडिकल चेक अप कॅम्प चे आयोजन दरवर्षी करण्यात येते. अनाथ आश्रमातील मुलांना अन्न दान, औषधोपचार द्वारे सेवा केली जाते.
डॉ. प्रियंका बेंडाळे यांच्या या सामाजिक उपक्रमांची दखल घेत राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ प्रियंका बेंडाळे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक करन्यात येत आहे
Comments
Post a Comment