मोहोळ तालुका पत्रकार संघ व सिध्दनागेश फर्निचर मोहोळ यांच्या वतीने लसीकरण कॅम्पचे आयोजन ..


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
कुरुल प्रतिनिधी: नानासाहेब ननवरे 

मोहोळ शहरातील  सिद्धनागेश फर्निचर व मोहोळ तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कोव्हीड लसीकरणाला पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त मोहोळ शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या लसीकरणा मध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांनी केले आहे 

 सिद्धनागेश फर्निचर कन्या प्रशाला रोड येथे घेण्यात आलेल्या या शिबीराचे उद्घाटन मोहोळचे तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
या वेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके , पोलीस निरीक्षक अशोक सायकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रल्हाद गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी अरुण पात्रुडकर, शिरापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाय जे जगताप आदी उपस्थित होते. 
[]
या लसीकरणासाठी तालुका आरोग्य विभाग व मोहोळ नगरपरिषद मोहोळ यांच्या कडून मोठे सहकार्य लाभत आहे . अत्यंत कमी कालावधीमध्ये लसीकरण करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत.या लसीकरण शिबिरात सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येकाला लकी ड्रॉ  कुपन देण्यात येणार असून त्या कुपनवरती फ्रिज, एलईडी, मिक्सर,कुकर अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत.

 त्यामुळे या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.दि. 9 ते 12  डिसेंबर पर्यंत  शिबीर 4 दिवस चालणार असुन यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  नागेश महामुरे , प्रशांत पवार, व मोहोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष  बालाजी शेळके व मोहोळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न