जनशक्ती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी कोळेकर यांची तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी गायकवाड यांची निवड




पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि २०
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 
जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य च्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी बाबाराजे लक्ष्मण कोळेकर यांची तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी शरद महादेव गायकवाड यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे महासचिव रउफ पटेल  यांनी दिले आहे.

 या निवडीनंतर बाबाराजे कोळेकर व शरद गायकवाड यांचा अतुल खूपसे पाटील यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कोळेकर व गायकवाड यांचे कार्य पाहून व त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनात प्रत्यक्षात सहभाग नोंदवून जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी व समाजातील वंचित घटकांसाठी उभा केलेली चळवळ आणि त्यातून मिळालेला न्याय यामुळेच त्यांची संघटनेच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे खूपसे पाटील यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न