लऊळ गावांमध्ये जिजाऊ आईसाहेब यांच्या जयंती निमित्त 51 रक्तदात्यांचे रक्तदान.
प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
दि: १२रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा
तालुक्यातील लऊळ गावात प्रहार जनशक्ती पक्ष विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण भैय्या लोकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे तालुका अध्यक्ष अमोल केसरे संतोष कवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
राजमाता जिजाऊ साहेबांनी स्वराज्य निर्मिती साठी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजे हे दोन अनमोल हिरे राष्ट्राला अर्पण केले आणि त्यांच्यासमवेत कित्येक मावळ्यांनी स्वतःचे रक्त सांडे पर्यंत अगदी मृत्यूच्या खाईत जाऊन स्वराज्यासाठी आपले देह अर्पण केले.
[]
अशा स्वराज्यातील माझ्या गोरगरीब जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे काम करणारे लोकनायक वंदनीय बच्चु भाऊ यांच्या स्वरूपात शिवरायांचा खराखुरा मावळा सापडला असून भाऊ महाराष्ट्रात रुग्णसेवेचे काम मोठ्या ताकतीने करत आहेत,स्वतः चार वेळा आमदार असून सुद्धा 81 वेळा रक्तदान त्यांनी केले आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्यासाठी सोलापूर प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा मोठ्या ताकदीने काम करत आहे.
आणि रक्तदानाच्या बाबतीत जिल्ह्यातील अनेक तरुण पुढे येऊन प्रहार च्या माध्यमातून रक्तदान करत आहे. त्याचप्रमाणे आज लऊळ गावातील अनेक तरुणांनी रक्तदान करताना एक वेगळाच आदर्श निर्माण केला.
यावेळी संजय बापू लोकरे उपसरपंच लवूळ,विष्णू नलवडे,कल्याण गाडे शेड सिंग चे सरपंच आनंद कोयले उपसरपंच औदुंबर शिरसागर,अभिजीत पाटील महेश पाटील गणेश लोकरे, गोविंद नलवडे धनाजी गवळी दत्तात्रय लोकरे पत्रकार आकाश लोकरे सौरभ लोकरे पांडुरंग लोकरे या सर्वांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment